आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला:आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार : नाना पटोले

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2024 मध्ये पक्ष सर्वात मोठा होणार, आमची भूमिका आम्हीच ठरवणार

लाेकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याचे संकेत शरद पवार यांनी गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात दिले असतानाच स्थानिक व िवधानसभा िनवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत महाविकास अाघाडी एकत्रितपणे काम करेल, असेही पवार म्हणाले हाेते. यावर, अामची भूमिका अाम्हीच ठरवू, अशा शब्दांत पटोलेंनी प्रत्युत्तर दिले.

मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न
आगामी निवडणुकीत अाघाडीसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन अाघाडीशी अद्याप तरी चर्चा किंवा प्रस्ताव नाही. मात्र धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी छाेट्या पक्षांशी संपर्क साधण्यात येईल, असेही पटाेले म्हणाले.

शिवसेनेलाही टाेला

शिवसेना-भाजपची मैत्री २५ वर्षे हाेती. यातून शिवसेना काय शिकली आहे, हे त्यांनी पहावे. आम्हाला त्यांनी काही सांगू नये, असा टोला पटोले यांनी शिवसेनेला लगावला. संजय राऊतही अाम्हाला मार्गदर्शन करत असतात, असेही पटोले म्हणाले.

कोविड नियमांचे उल्लंघन; पटोलेंवर गुन्हा दाखल
बुलडाणा | कोविड आढावा घेत विदर्भातून दौरे करत निघालेले काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताचा जल्लोष केला. खामगाव व शेगाव येथेही कार्यक्रम झाले. यामुळे कोविडनियमांचे, संचारबंदी व जमाबंदीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या चौकशीत पटोले यांचे नाव समोर आल्यास त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करू, असे पोलिस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...