आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Connect Customers To Solar Roof Top Schemes; Project Director Of Mahavitaran Company Prasad Reshme Gave The Instructions In The Meeting| Marathi News

नियुक्त:सोलर रूफ टॉप योजनेत ग्राहकांना जोडणी द्या; महावितरण कंपनीचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी बैठकीमध्ये दिले निर्देश

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सोलर रूफ टॉप योजनेत ग्राहकांना तत्परतेने व सुलभतेने जोडणी मिळावी, यासाठी महावितरणकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी नियुक्त एजन्सीनेही आपल्या कामाचा वेग वाढवावा,’ असे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प ) प्रसाद रेशमे यांनी महावितरणचे अधिकारी व एजन्सी यांच्या संयुक्त बैठकीत दिले.

महावितरणच्या अकोला परिमंडल कार्यालय येथे आयोजित बैठकीत संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी सोलर रूफ टॉप योजनेचा आढावा घेतला. या योजनेत ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी शिबिर आयोजित करा, कौन्सिलिंग सेल तयार करा, ग्राहकांशी संवाद साधा, ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा पाणी पुरवठा योजना सोलर पॅनल लावण्यासाठी तयार असेल तर त्यांना या योजनेत प्राधान्याने जोडणी द्या, असे निर्देश प्रसाद रेशमे यांनी बैठकीत दिले.

सोलर रूफ टॉप योजनेचा अकोला परिमंडल अंतर्गत आतापर्यंत ३,३२२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. योजनेत ग्राहकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी महावितरणच्य अधिकाऱ्यांनी रूफ टॉप लावणाऱ्या एजन्सीच्या नियमित बैठका घेऊन ग्राहकांना एजन्सीकडून चांगली सेवा मिळावी यासाठी एजन्सीच्या कामकाजावर देखरेख ठेवावी, असे निर्देशही देण्यात आले. आढावा बैठकीत अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, संजय आकोडे, मंगेश वैद्य. अनिल वाकोडे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अश्विनी चौधरी तसेच इतर कार्यकारी अभियंता, महावितरणचे उप विभागीय अधिकारी व एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...