आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यास धोका:नाल्यांची साफसफाई न झाल्याचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यास धोका; डाबकी रोड परिसरातील नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी मुख्य मार्गावर

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोरदार पाऊस झाल्या नंतर नाल्यातील पाणी मुख्य मार्गावर साचण्याचे चित्र अकोलेकर दरवर्षी पावसाळ्यात अनुभवतात. मात्र आता तापमानात वाढ झाल्या नंतर केवळ मुख्य नाले चोक झाल्याने नाल्यातील सांडपाणी मुख्य मार्गावर साचल्याचे चित्र डाबकी रोड वासीयांनी अनुभवले. यामुळे नागरिकांना सांडपाण्यातून जाणे येणे करावे लागले. परिणामी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

विविध मुख्य मार्गालगत सांडपाणी वाहुन नेणाऱ्या नाल्या आहेत. या नाल्यांची नियमित साफसफाई झाल्यास नाल्यातील सांडपाणी वाहुन जाते. मात्र नाल्याची साफसफाई न झाल्यास नाले तुंबतात आणि नाल्यातील घाणपाणी रस्त्यावर साचते. दरवर्षी पावसाळ्यात डाबकी रोडवर नाल्यातील पाणी वाहुन जात नसल्याने एक ते दिड फुट पाणी मुख्य मार्गावर साचते. मात्र आता पावसाळा नसताना डाबकी रोडवर असे पाणी साचले आहे. या साचलेल्या सांडपाण्यातून नागरिकांना मार्ग काढत घर गाठावे लागले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

नाला सफाई न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर : डाबकी मार्गावरील नाल्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने नाल्यातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचले आहे. उन्हाळ्यात ही अवस्था आहे, तर पावसाळ्यात काय होईल? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कारवाई नाही
शहरात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशवी वापरावर बंदी आहे. मात्र याबाबत महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक पिशव्याचा वापर सुरु आहे. या कमी दर्जाच्या प्लॉस्टिकमुळेही नाल्या चोकअप होतात. परंतु दुर्देवाने संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

बातम्या आणखी आहेत...