आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदासाठीच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दि.२० एप्रिल असून त्यानंतर खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बाजार समितीवर कधी भाजपची तर कधी संमिश्र आघाडीची सत्ता होती. बरेचदा वेगवेगळे लढणारे पक्ष हे निवडणुकीनंतर सत्तेसाठी एकत्र बसलेले सुद्धा दिसत होते. परंतु आता पहिल्यांदाच काँग्रेस आ.राजेश एकडे यांचे नेतृत्वात महाविकास आघाडीचे व माजी आ.चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनात बलदेराव चोपडे यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व शिवसेना असे पॅनल बाजार समितीवर सत्ता आणण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
दोन्ही बाजूकडून अद्यापही आपले उमेदवार जाहीर केलेले नसल्यामुळे अनेक उमेदवार पॅनल मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र उमेदवारांची वाढती संख्या पाहता ही निवडणूक त्या प्रमाणात सोपी राहिली असल्याचे चित्र दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व भाजपा शिवसेना अशा सरळ लढतीच्या अपेक्षेतून इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावून आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी जोर लावण्यावर भर दिला आहे. तरी जागा कमी व इच्छुक उमेदवार जास्त असे वातावरण असल्यामुळे दोन्हीही आघाड्यांमध्ये बिघाडी होऊन तिसरे पॅनल टाकण्यासाठी पण हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना या सध्याच्या सत्ता संघर्षाच्या फार्मूल्याचा विचार करता आजी-माजी आमदार यांचा बोलबाला या निवडणुकीत नक्कीच पाहावयास मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार, भाजपा व शिवसेना शिंदे गट या पक्षाची युती झाली असून सहा जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आल्या असून उर्वरित जागा भाजपा लढवणार आहे. तर महाविकास आघाडी करून लढणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटांने केवळ दोन जागांवर समाधान मानत राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा व उर्वरित जागा काँग्रेस निवडणूक लढणार हे ठरले आहे. दरम्यान, आगमी काळात होणाऱ्या निवडणुकीमुळे या निवडणुकीत विजय मिळवण्याासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधी केली जात आहेे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.