आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सांत्वनपर भेट

बार्शीटाकळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जमकेश्वर येथे विकी वसंता कोकरे रा.जमकेश्वर वय २२ वर्ष यांचा गावातील प्रवासी निवारा अंगावर कोसळून मृत्यू झाला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. व शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन आडे, महासचिव अजय अरखराव, पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, सदस्य रोहिदास राठोड, सदस्य दादाराव पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धीप्रमुख मिलिंद करवते, माजी पिंजर सर्कल अध्यक्ष श्रीकृष्ण भगत, शेख समद, पांडुरंग खरतडे, पद्माकर उरकडे, अमोल देशमुख, सलीम खान, नासिर खान, बिस्मिल्ला खान आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...