आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम:‘बांधकाम’मुळे विकासाची वाट बिकट; ३७ पैकी १६ काेटी खर्च

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री बच्चू कडू आणि वंचित बहुजन आघाडीत रस्त्यांच्या कामावरून वाद रंगला असतानाच गतवर्षभरात ३७ कोटींपैकी १६ कोटी १३ लाखांची कामे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग करू शकला. २१ कोटी ५५ लाख ५३ हजार २७९ रुपये अद्यापही शिल्लक आहेत. सन २०२०-२१ चा अर्खचित आणि २०२१-२२ या वर्षांचा असा एकूण ३७ कोटी ६९ लाख १ हजार ६४२ रुपये निधी उपलब्ध झाला होता. या कामात रस्ते, पशुवैद्यकीय दवाखाने, इतर जिल्हा रस्त्यांच्या मजबुतीकरणाचा समावेश आहे. त्यामुळे याच मुद्दावरून आता प्रहार विरूद्ध वंचित असा राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीकडून (डिपीसी) जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला रस्ते, पुलासह अन्य बांधकामांसाठी निधी मंजूर करण्यात येतो. जि.प.ने प्रस्ताव डिपीसीला सादर केल्यानंतर निधीचे वितरण होते. हा निधी दोन वर्षांत खर्च करणे अपेक्षित असले तरी बांधकाम विभागाने पं. सं. सह अन्य यंत्रणांकडून वेळीच प्रस्ताव मागवणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासह एकूणच नियोजन करणे आधीच करणे आवश्यक असते. मात्र वर्षाच्या शेवटी-शेवटी नियोजन होते आणि आर्थिक वर्ष किंवा निधी खर्च करण्याची मुदत संपत असतानाही पैसे खर्च होत नाही. असाच काहीसा प्रकार यंदाच्या आर्थिक हिशोबानंतर अर्थ विभागाने तयार केलेल्या अहवालावर नजर टाकल्यास दिसून येते. बांधकामाविभागाकडे २१ कोटी ५५ लाख ५३ हजार २७९ शिल्लक असून, हे पैसे मार्चपर्यंत खर्च करावे लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...