आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Construction Of Ganesh Ghat At 5 Places Along Morna River; Arrangements For Environment friendly Ganpati Immersion At Various Places In The City

बाप्पा निघाले गावाला!:मोर्णा नदीकाठी 5 ठिकाणी गणेश घाटाची निर्मिती; शहरात विविध ठिकाणी पर्यावरणपुरक गणपती विसर्जनासाठी व्यवस्था

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आवाजात लाडक्या बाप्पाला भाविक निरोप देणार आहेत. महापालिका प्रशासनाने मोर्णा नदीकाठी 5 ठिकाणी गणेश घाटाची निर्मिती केली असून, शहराच्या विविध भागात 11 ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टाक्याची निर्मीती करण्यात आली आहे.

महापालिकेडून विसर्जनासाठी सोय

शहरातून मोर्णा नदी वाहते. मात्र मोर्णा नदीवर दोन प्रकल्प तसेच मोर्णा नदीला येवून मिळणाऱ्या विद्रुपा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा असूनही मोर्णा नदीची पातळी कमीच आहे. तसेच शहरात आता पूर्वी सारख्या विहिरी राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने मोर्णा नदीकाठी 5 ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश घाटावर निर्माल्य संकलित करणार

शहर कोतवाली जवळ मुख्य गणेश घाट निर्माण करण्यात आला आहे. या ठिकाणी 8 कृत्रिम टाके बांधण्यात आले आहे. त्याच बरोबर खासगी लक्झरी स्थानकाच्या बाजुला तसेच बोट क्लब, बलोदे ले-आऊट भागात हिंगणा येथे तर हरिहरपेठ भागात सप्तश्रृंगी माता मंदिराच्या मागे गणेश घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. मोर्णा नदीवरील गणेश घाट तसेच शहरातील विविध गणेश घाटावर निर्माल्य संकलीत केले जाणार असून हे निर्माल्य खत निर्मिती करता दिले जाणार आहे.

शहरात 11 ठिकाणी कृत्रिम टाक्यांची व्यवस्था

शहराच्या विविध भागात गणेश भक्तांना सोईचे जावे यासाठी विविध मंडळाच्या वतीने 11 ठिकाणी घरगूती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्व झोन मध्ये जवाहर नगर चौक, भारत विद्यालया समोरील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, श्री शिवाजी महाविद्यालया जवळील शिवाजी पार्क, मोठी उमरी भागात विश्वकर्मा मंदिरा समोर, नेहरु पार्क जवळ डेल्टा टिव्हीस शोरुम जवळ पश्चिम झोन मध्ये जुने शहरातील रेणुका नगर भागात बाभळेश्वर चौक. उत्तर झोन मध्ये अकोट फैल, हनुमान मंदिरा जवळ तर दक्षिण झोन मध्ये मलकापूर रोड, रिंगरोड, संत तुकाराम चौका जवळ आदी ठिकाणी कृत्रिम टाके तयार करुन घरगुती गणेश विसर्जनाची व्यवस्था विविध मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याठिकाणी विसर्जित झालेल्या गणेश मुर्त्या महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी नेण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...