आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात हर हर महादेवचा जयघोष:शहरात कावड बांधायला सुरुवात; देखावे सजले, यंदा मानाची कावड 771 घागरची

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यात आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी भव्य जलाभिषेक करण्यात येतो. यासाठी कावडधारी रविवारी सकाळपासून पूर्णा नदीतून जल भरून आणण्यासाठी निघणार आहेत. त्यामुळे शनिवारी शहरात चौका-चौकात आणि रस्तांवर कावड बांधायच्या कामाला सुरुवात झाली आहे.

यंदा जय भवानी मित्र मंडळाची कावड सर्वाधिक मोठी असणार आहे. मंडळाकडून 2100 घागर जलाचा अभिषेक राजराजेश्वराला करण्यात येणार आहे. मानाची हरिहर मंडळाची कावड 771 घागरीची असणार आहे.

रस्त्यावर लागले तोरण

हरिहरपेठ मंडळ, राजेश्वर पालखी, खोलश्वर, जागेश्वर, बाबळेश्वर मित्र मंडळ, जय महाकाल आदी मंडळांची पालखी व कावड महोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मंडळांमध्ये घागर, देखाव्यांमध्ये चढाओढ आहे. दोन घागरीपासून 500-600 घागरीची कावड पालखीमध्ये बघावयास मिळते. यंदा हरिहर मंडळाची कावड 2100 घागरीची राहणार आहे. टिळक रोड, जुना कापड बाजार येथून मोठ्या कौशल्याने या भव्य कावड, पालखी मार्गक्रमण करणार आहेत. कावडीसोबत देखावेही बघावयास मिळणार आहे. जय भवानी, महाकाल, शंभो, राधा-कृष्ण, शिवलिंग असे देखावे रस्तोरस्ती दिसून येत आहेत.

उत्साहात दुप्पट वाढ

2019 मध्ये मोठ्या उत्साहात कावड महोत्सव संपन्न झाला. हजारो घागर पाण्याचा जलाभिषेक राजराजेश्वराला करण्यात आला. दोन वर्षापासून कोरोनामुळे कावड महोत्सवावर निर्बंध होते. दरम्यान फक्त राजराजेश्वर मंडळाच्या मानाच्या कावडद्वारे शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला. मात्र, यंदा कोरोनाचे निर्बंध हटले आहेत. त्यामुळे कावड महोत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. लहानलहान असंख्य कावड महोत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. राजराजेश्वर मंदिरांमध्ये आतापासूनच भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

महिलांची कावड लक्षवेधी

यंदा कावड महोत्सवात महिलांच्याही 8 कावड असणार आहे. आतापर्यंतच्या कावड महोत्सवातील ही सर्वाधिक मोठी संख्या आहे. 10 ते 25 घागरपर्यंची कावड महिलांची असणार आहे. या महिलांच्या कावडही रविवारी सकाळी अकोल्यापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा नदीकडे जलभरण्यासाठी प्रस्थान करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...