आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेळघाट व्याघ्रप्रकल्पातील अकोट वन्य जीव विभाग आणि निसर्ग मित्र मंडळाच्या संयुक्त सहकार्याने यावर्षीचा ५० वा जागतिक पर्यावरण दिन गुल्लरघाट परिक्षेत्रातील पूर्व बिटमध्ये श्रमदानाने साजरा केला. तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरण तयार करून त्यात विशिष्ट जातीच्या गवताची लागवड करून तो गवताळ प्रदेश त्यांच्यासाठी राखीव ठेवायचा. त्या भागातून पावसाच्या पाण्याने वाहत जाणारी सुपीक माती जतन करण्यासाठी धारगड वन्यजीव परिक्षेत्राचे अधिकारी सुरत्ने, वनसंरक्षक, वनमजुर, काही निसर्गप्रेमींनी येथे पर्यावरण दिनाचे निमित्त साधून सहा बंधाऱ्यांची निर्मिती केली. हा उपक्रम उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला. या वेळी पक्षीमित्र दीपक जोशी यांनी या दिनाची महती विषद केली. ते म्हणाले की १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण दिनाची घोषणा केली. पर्यावरण दिनाचे हे ५० वे वर्ष. पहिल्या जागतिक पर्यावरण दिनाचे ब्रीदवाक्य //"ओन्ली वन अर्थ-एकमेव पृथ्वी//" हे आजही लागू होते. आजही ते लागू ह़ोते. पृथ्वी शिवाय मानवाला अधिवास नाही. निसर्गाचा विनाश आणि प्रदूषण वाढतच आहे. तेव्हा या दिनाचे महत्व अधोरेखित करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निसर्ग सेवा, संरक्षण विविध मार्गाने प्रत्येकाने करायलाच हवी, असे ते म्हणाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुरत्ने यांनी अभयारण्ये ही निसर्गसंपदेच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी, समाजातील सर्व स्तरातील जनांसाठी लाभदायी, आनंददायी असतात. त्यांचे संगोपन करणे हे वनविभागाचे कर्तव्य आहे, ते बजावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले. दगडी बंधारे बांधण्यासाठी वनविभागाचे सुरत्ने यांच्यासह खामकर, लंबाडे, केंद्रे, वनमजूरांसह निसर्ग सेवा मंडळाचे डॉ.अतुल मुंदडा, नितीन दांदळे, हंसराज मराठे, हेमंत शहा, दीप्ती जोशी, चक्रनारायण, सचिन अहिर, सोनाली अहिर यांनी मानवी साखळी तयार करून बंधाऱ्यांचे काम तत्परतेने पूर्ण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.