आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविशील्ड:जिल्ह्यात कोविशील्डच्या 21 लाख डोसचा वापर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत प्रारंभापासून तब्बल २१ लाख ९३ हजार कोविशील्ड डोसचा वापर केला. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनच्या डोसचा वापर हा २६. १९ टक्के म्हणजे ४ लाख ४४ हजार एवढा झाला आहे.

जिल्ह्यात सात टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, प्रारंभापासूनच कोविशील्ड लसींचा पुरवठा जास्त झाल्याने कोविशील्डच्या लाभार्थ्यांची संख्याही दुसऱ्या आणि बूस्टर डोससाठी वाढत गेली. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १६ लाख ९७ हजार २०६ लाभार्थींनी कोविशील्डचा डोस घेतला आहे. १५ जुलैनंतर बूस्टर डोस मोहिमेसह इतर गटातील लसीकरण वाढल्याने काही दिवसांपूर्वी कोविशील्डची टंचाई निर्माण झाली होती. बुलडाणा, हिंगोली व वर्धा जिल्ह्यातून लस मागवली होती. त्यानंतर ४ लाख ४४ हजार ६६३ लाभार्थींनी कोव्हॅक्सिन लसीचा डोस घेतला आहे. लसीकरणासाठीच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या ही १५ लाख ८९ हजार ४४० एवढी आहे. १२ ते १४ वयोगटातील ५१ हजार ५२६ मुलांनी कॉर्बेव्हॅक्स लसीचा डोस घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...