आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:जिल्ह्यातील 24 गावांना दूषित पाण्याचा पुरवठा ; पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्लिचींग पावडर उपलब्ध नसण्यासह अन्य कारणांस्तव जिल्ह्यातील २४ गावांना दूषित पाणी पुरवठा हाेत आहे. परिणामी जलजन्य आजाराचा धोका वाढला वाढला आहे. पाणी नमुन्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली हाेती. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी ग्रामपंचायतस्तरावर होणे अपेक्षित आहे. मात्र काही ग्रामपंचायतींकडून ही खरेदीच हाेत नाही. परिणामी ग्रामस्थांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडर विनाच हाेताे. त्यामुळे अनेकांना आराेग्याशी संबंधित समस्यांना ताेंड द्यावे लागते.

खर्च पाण्यात नागरिकांना आराेग्य सुविधा मिळावी, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र-राज्य शासनाकडून काेट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येताे. अनेक आजार हे अशुद्ध पाणी पिल्याने हाेतात. जलजन्य आजार हाेऊ नये, यासाठी जनजागृतीसह इतरही प्रयत्न हाेत असल्याचा दावा यंत्रणेकडून करण्यात येताे. मात्र अनेक ठिकाणी पुरवठा हाेणारे पाणी दूषित हाेते.

बातम्या आणखी आहेत...