आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाह्य स्त्रोतामार्फत स्त्री रुग्णालयात झालेल्या कंत्राटी पदभरती प्रकरणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पराग गवई यांनी रामदासपेठ पोलिसांत तक्रार करून सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ५०० खाटांच्या विस्तारातील वर्ग तीन व वर्ग चारची शंभरहून अधिक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून आर्थिक मागणी झाली अशा मौखिक तक्रारी आहेत. त्या आधारावर रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पराग गवई यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत जिल्हा स्त्री रुग्णालय आणि आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर २७ मे रोजी रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीतही हे प्रकरण चांगलेच गाजले. या सभेत बाह्यस्त्रोत कंपनीचे व्यवस्थापक आणि दोन्ही कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त करत पराग गवई यांनी पोलिसात तक्रार अर्ज केला आहे. तक्रार अर्जात म्हटले की, संबंधित कंपनीकडून जिल्हा स्त्री रूग्णालयासोबत झालेल्या करारनाम्यानुसार १०३ कुशल अकुशल मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे. परंतु या भरती प्रक्रियेची कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली नाही. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय व आरोग्यसेवा उपसंचालक कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या नातेवाइकांची नियमबाह्य निवड करून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. उमेदवारांना कामावर रुजू करून घेतले. ही भरतीप्रक्रिया गुणवत्तेनुसार राबवण्यात आली नाही. त्यामुळे मुद्देनिहाय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मुद्द्यांच्या चौकशीची मागणी : पराग गवई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात जाहिरात, अर्जाची प्रक्रिया, पदभरतीची नियमावली, शैक्षणिक पात्रता, पदे मंजूर कोणी केली, कागदपत्र पडताळणी आदी १४ मुद्द्यांच्या चौकशीची मागणी केली. उपसंचालक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या मोबाइल एसडीआर, सीडीआरची चौकशी करा असेही त्यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.