आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या जलकुंभाचे काम करण्यास कंत्राटदाराचा नकार:जलकुंभाचे काम न झाल्यास पैसे परत जाण्याची शक्यता

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत डाबकी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील रखडलेल्या जलकुंभाचे काम बुधवारी पोलिस संरक्षणात सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र जलकुंभाच्या बांधकामास झालेला विरोध लक्षात घेवून कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जलकुंभाचे काम न झाल्यास पैसे परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान प्रशासनाने अद्याप याबाबत ठोस निर्णय न घेतल्याने जलकुंभाच्या कामाचे नेमके काय होणार? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या सबलीकरणाचे काम सुरु करण्यात आले. यात शहरात (मुळ हद्द) आठ नविन जलकुंभाचे बांधकाम केल्या जाणार होते. यापैकी सात जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. तर जुने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानातील जलकुंभाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे या जलकुंभाचे काम रखडले होते. दरम्यान महापालिका प्रशासनाने जलकुंभाचे काम सुरु व्हावे, यासाठी पोलिस संरक्षण मागीतले. यासाठी सात लाख रुपयाचा भरणाही पोलिस प्रशासनाकडे केला. परंतु कंत्राटदाराने जलकुंभाचे काम सुरु करण्यास नकार दिल्याने तीन वर्षा नंतर जलकुंभाच्या कामाच्या पुन्हा निविदा बोलावण्यात आल्या. जलकुंभाचे काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र पुन्हा परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जलकुंभाचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला होता.

आता अनेक महिन्या नंतर पुन्हा पाणी पुरवठा विभागाने जलकुंभाचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र खड्डा खोदणाऱ्या मशिनच्या चालकाने परिस्थिती पाहून काम सुरु करण्यास नकार दिला. त्यामुळे काम सुरु होवू शकले नाही. प्रशासनाने पोलिस संरक्षणाची मागणी केली. पोलिस संरक्षण देण्यासही तयार झाले. मात्र बांधकामास झालेला विरोध लक्षात घेवून कंत्राटदार तसेच खड्डा खोदण्यासाठी आलेल्या मशिन ड्रायवर तसेच मजुरांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे बुधवारी देखील जलकुंभाचे काम सुरु हो‌वू शकले नाही. त्यामुळे आता जलकुंभाच्या बांधकामावरच प्रश्न निर्माण झाला आहे.

पैसे परत जाण्याची शक्यता

अमृत टप्पा-1 मधील कामांचा अहवाल दिल्या नंतर अमृत-२ मधील कामांसाठी निधी मिळणार आहे. जलकुंभाचे काम सुरू झाल्या शिवाय अहवाल देता येत नाही. त्यामुळे या जलकुंभाचे दोन कोटी रुपये परत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या जागे ऐवजी पर्यायी जागाही उपलब्ध नसल्याने जलकुंभाच्या कामाबाबत पेच निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...