आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत खेळखंडोबा सुरू:कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनी ठेवले कंत्राटी कर्मचारी; आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायम आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्या जागी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार नियुक्त करून त्यांच्याकडून सफाईचे काम करुन घेण्याचा प्रकार महापालिकेच्या स्वच्छता विभागात उघडकीस आला आहे.

स्वच्छतेचे काम योग्यरित्या व्हावे, या हेतुने प्रशासनाने मनपा क्षेत्रातील 20 प्रभागाचे एकूण 80 भाग केले. तर जनता भाजी बाजाराचा स्वतंत्र भाग पाडण्यात आला. या 81 भागांपैकी 30 भाग प्रशाकीय आहेत तर 51 भाग हे पडीक आहेत. प्रशासकीय भागासाठी 650 कायम आस्थापनेवरील कर्मचारी नियुक्त आहेत तर 51 पडीक भागासाठी 651 कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे काम करुन घेतल्या जाते. दरम्यान मंगळवारी आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी प्रशासकीय आणि पडीत भागांची आकस्मिक तपासणी केली. यात तपासणीत पडीत भागातील अनेक सफाई कामगार गैर हजर आढळून आले तसेच प्रशासकीय प्रभागातील काही कायम कर्मचाऱ्याच्या जागी दुसरे कामगार आढळून आले.

कायम आस्थापनेवर नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ऐवजी मजुरी पद्धतीने सफाईचे काम करण्यासाठी मजुर ठेवल्याची बाब उघड झाली. या प्रकारामुळे आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त संबंधीत प्रभागाच्‍या आरोग्‍य निरिक्षकांची कानउघडणी केली तसेच गैरहजर सफाई कामगार विरुध्‍द कठोर कारवाईचे आदेश दिले. यापुढे स्‍वच्‍छतेच्‍या कामात कोणत्‍याही प्रकारचा कामचुकारपणा खपून घेतला जाणार नाही, अशी ताकीद दिली.

स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र तुलनेने स्वच्छता होत नाही. शहरात नियमित व नियमानुसार स्वच्छतेची कामे व्हावीत, यासाठी आयुक्तांनी आठ पथके स्थापन केली आहेत. यात आयुक्‍त यांचे स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी, मोटर वाहन विभाग प्रमुख अनिल बिडवे, मुख्‍य अग्निशमन अधिकारी हारूण मनियार, आरोग्‍य स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, सहा.नगररचनाकार संदीप गावंडे, जी.आय.एस.विभाग प्रमुख चंदन प्रसाद, संगणक विभागाचे हिरा मनवर आणि बांधकाम विभागाचे गौतम कांबळे यांचा समावेश आहे. ही पथके सकाळी सात ते आठ या दरम्यान दिलेल्या भागात स्वच्छतेची कामे झाली की नाही? याची तपासणी करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...