आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी:महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनी ठेवले कंत्राटी कर्मचारी

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायम आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्या जागी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार नियुक्त करुन त्यांच्याकडून सफाईचे काम करुन घेण्याचा प्रकार महापालिकेच्या स्वच्छता विभागात उघडकीस आला. दरम्यान हा प्रकार पुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी दिला.

स्वच्छतेचे काम योग्यरित्या व्हावे, या हेतूने प्रशासनाने मनपा क्षेत्रातील २० प्रभागाचे एकूण ८० भाग केले. तर जनता भाजी बाजाराचा स्वतंत्र भाग पाडण्यात आला. या ८१ भागांपैकी ३० भाग प्रशाकीय आहेत तर ५१ भाग हे पडीक आहेत. प्रशासकीय भागासाठी ६५० कायम आस्थापनेवरील कर्मचारी नियुक्त आहेत तर ५१ पडीक भागासाठी ६५१ कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे काम करुन घेतले जाते.

बातम्या आणखी आहेत...