आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरतूद:लम्पी चर्मराेग नियंत्रण; डीसीपीतून 1 काेटींची तरतूद

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवंशीय जनावरांमधील लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी उपकरणे व साहित्य खरेदीकरता जिल्हा नियाेजन समितीमधून (डीपीसी) १ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गत काही महिन्यांपासून लम्पी आजाराने थैमान घातले असून, अद्यापही प्रादुर्भाव आटाेक्यात आलेला नाही.

शेतकऱ्यांना जोडव्यवसाय व शेतीकामात महत्वाची भूमिका जनावरांची असते. आधीच शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. अशातच जोडधंदा म्हणून शेतकरी बांधवांना त्यांच्याकडील जनावरांच्या माध्यमातून संसार चालवण्यासाठी थोडी मदत होत होत असतानाच लम्पी राेगाने धुमाकूळ घातला. दरम्यान या राेगाच्या नियंत्रणासाठी शासनाकडून १ काेटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

काय आहे आदेशात? ः गोवंशीय जनावरांमधील लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी एक काेटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा आदेश कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केला आहे. यापूर्वी जिल्हा नियाेजन समितीकडील निधीतून २ काेटी रुपये मंजूर करण्यात आले हाेते. आता या व्यतिरिक्त १ काेटी रुपये मंजूर झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...