आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन‎:याेगगुरु बाबा रामदेव यांच्याकडून वादग्रस्त‎ वक्तव्य; प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जाेडे‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

याेग गुरु बाबा रामदेव यांनी‎ मुस्लिम, इस्लामबाबत वादग्रस्त‎ वक्तव्य केल्याचा अाराेप करीत‎ जनसत्याग्रह संघटनेने शुक्रवारी‎ आंदाेलन केले. आंदाेलकांनी‎ रामदेव बाबा यांच्या पुतळ्याला‎ चप्पला मारत संताप व्यक्त केला.‎ राजस्थान येथील एका‎ कार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव‎ यांनी भावना दुखतील, असे‎ वक्तव्य केल्याचे जन सत्याग्रह‎ संघटनेचे म्हणणे अाहे. इस्लाम,‎ नमाज पठणबाबत वादग्रस्त वक्तव्य‎ केले. बाबा रामदेव बाेलत‎ असतानाचा िव्हडीअाे प्रसारित‎ झाला. दरम्यान मुस्लिम संघटना,‎ युवकांनी रस्त्यावर धाव घेत‎ आंदाेलन केले. ऑटाे स्टँड ते‎ मदनालाल धिंग्रा चाैकापर्यंत‎ योगगुरू बाबा रामदेव यांचा‎ प्रतिकात्मक पुतळा हातात घेत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घाेषणा दिल्या. प्रतिकात्मक‎ छायाचित्राला चपला-जाेडे मारत‎ रोष व्यक्त केला. या वेळी पोलिस‎ बंदोबस्त ठेवण्यात आला होता.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष‎ आसिफ खान यांच्या‎ मार्गदर्शनाखाली हे आंदोलन‎ करण्यात आले.

या आंदाेलनात‎ अब्दुल सलाम, शेख अासीफ,सै.‎ नासीर, साहिल रिजवी, फिराेज‎ खान, इरफान खान, िवक्की घई,‎ सै. जहीर अादी सहभागी झाले.‎ या केल्या मागण्या : देशात‎ अनेक िठकाणी बाबांकडून वादग्रस्त‎ वक्तव्य करण्यात येत असून,‎ देशातील वातावरण दूषित हाेत‎ अाहेत. त्यामुळे बाबा रामदेव‎ यांच्यावर कठाेर कायदेशीर कारवाई‎ करण्यात यावी, त्यांना कारागृहात‎ टाकण्यात यावे, अशी मागणी‎ अासिफ खान त्यांनी केली.‎ वाहतुकीवर परिणाम :‎ आंदाेलन मध्यवर्ती बस‎ स्थानकासमाेर असलेल्या‎ मदनलाल चौकात करण्यात‎ अाले.याच ठिकाणी बसची वाहतूक‎ माेठ्या प्रमाणावर हाेत असते.‎ आंदोलनालामुळे काही वेळ‎ वाहतुकीची कोंडी झाली होती.‎ वाहतूक पोलिसांनी आंदोलन‎ संपल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.‎

बातम्या आणखी आहेत...