आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा वाढता धोका:वाशिममध्ये कोरोनाचा भडका, 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; वसतीगृहाचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित

वाशिम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे.

महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातून चिंताजनक वृत्त येत आहे. येथे एका मुलांच्या वसतीगृहात एकाच वेळी 229 विद्यार्थी आणि 3 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या हॉस्टेलमध्ये अमरावती, नांदेड, वाशिम बुलढाणा आणि अकोल्याचे 327 विद्यार्थी राहत होते. आता संपूर्ण हॉस्टेल क्वारंटाइन सेंटरमध्ये बदलण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच राज्य मंत्री संजय राठोड हजारो समर्थकांसह मंदिरात पोहोचले होते.

वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेमधील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झालेच्या विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 इतके आहे.

या शाळेचा परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. कोरोना बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी हे शाळेच्या वसतिगृहातील निवासी स्वरुपात राहणारे आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 151, बुलडाणा जिल्ह्यातील 3, यवतमाळ जिल्ह्यातील 55, वाशिम जिल्ह्यातील 11, अकोला जिल्ह्यातील 1, हिंगोली जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...