आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णसंख्या:कोरोनाचे सहा नवे रुग्ण;सक्रिय रुग्णसंख्या 20 ; खासगी प्रयोगशाळेतून सहा आरटीपीसीआर अहवाल

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी, १४ जूनला एकाच दिवसात जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सक्रिय रुग्ण संख्या २० झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीनुसार मंगळवारी, १४ जूनला आरटीपीसीआरचे २२१ अहवाल आले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर खासगी प्रयोगशाळेतून सहा आरटीपीसीआर अहवाल आले. त्यात पाच रुग्ण आढळले. दिवसभरात सहा रुग्ण आढळले. यातील एक महिला ही मनपा हद्दीतील आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या बाधित रुग्णांची संख्या ६५२०१ झाली. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांत रविवारपर्यंत ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश होता. एकूण रुग्णांपैकी सहा रुग्ण रुग्णालयात आहेत. इतर रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...