आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:विदर्भात 3532 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 31 जणांचा मृत्यू, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने 3 लाखांच्या पार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८,८०७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ८० जणांचा मृत्यू झाला.

विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये बुधवारी कोरोनाचे एकूण ३५३२ नवे रुग्ण आढळले असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने ३ लाखांच्या वर पोहोचली. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८,८०७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ८० जणांचा मृत्यू झाला.

अमरावती ८०० पार
पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात ८०२, अकोला- ३८५, यवतमाळ- २१५, बुलडाणा- ३६८, वाशीम- ३१८ असे एकूण २०८८ एवढे रुग्ण आज पॉझिटिव्ह आढळून अाले. दरम्यान, उपरोक्त पाच जिल्ह्यांत कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकट्या अमरावती जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यात ११८१, भंडारा- १४, चंद्रपूर-३४, गोंदिया- १०, वर्धा- १००, गडचिरोली- ६ याप्रमाणे एकूण १४४४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून यात नागपुरातील १० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत नागपूर विभागातील मृतांची संख्या ४८५७ आणि अमरावती विभागातील मृतांची संख्या १६३९ एवढी झाली असून संपूर्ण विदर्भातील ६ हजार ४९६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सोलापुरात संचारबंदी
साेलापूर शहर व जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी जाहीर केला. गुरुवारी रात्री ११ पासून याचा अंमल सुरू हाेईल.

बातम्या आणखी आहेत...