आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेनाच्या कठीण काळात प्रशासनाला दिशा देण्याचे काम पालकमंत्र्यांचे असते. मात्र, या काळात काही जिल्ह्यांना पालकमंत्री दिसणे दुर्मिळ झाले हाेते. प्रशासनात निर्णय घेणारेच दिसत नव्हते. आता पालकमंत्री घराबाहेर पडत आहेत. पश्चिम विदर्भात काेराेनाची साखळी राेखण्यासाठी पालकमंत्र्यांनी काय मेहनत घेतली, त्याचा हा घेतलेला आढावा. अमरावतीत मात्र काहीसे सकारात्मक चित्र होते.
पालकमंत्री अकाेला : बच्चू कडू
सकारात्मक: विशेष काही नाही. उशिरा का होईना आता त्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकातील तज्ज्ञ मान्यवरांच्या सूचना ऐकून घेतल्या आहेत.
नकारात्मक: प्रशासनावर पकड नाही. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस अधीक्षक, सिव्हिल सर्जन यांच्यात समन्वय नव्हता. समन्वय घडवून आणण्यात अपयश.
बैठका संख्या 10 | कधी : मार्च ते जून
विशेष काम : कृषी विद्यापीठातील क्वॉरंटाइन सेंटरची स्वतः पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर तेथील रुग्णांच्या जेवणाचा दर्जा सुधारला .
माेठी चूक : प्रशासनाकडे दुर्लक्ष झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सात दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र सचिव स्तरावरून या लॉकडाऊनला मंजुरी दिली नाही.
पालकमंत्री बुलडाणा : डाॅ. राजेंद्र शिंगणे
सकारात्मक: कोविड सेंटरसाठी व्हेंटिलेटर व पीपीई किटसाठी प्रयत्न केले. कोविड केंद्रांनाही भेटी दिल्या. राज्य शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न.
नकारात्मक: जिल्हा प्रशासनावरील पकड सैल. अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास विलंब. प्रभावीपणे लाॅकडाऊन राबवता आले नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतच आहे.
बैठका संख्या 05 | कधी : मार्च ते जून
विशेष काम : चौदाही तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देऊन बैठका घेतल्या. यासोबतच ऑनलाइन बैठका घेत समस्या साेडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
मोठी चूक : चढ्या दराने हाेणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकडे दुर्लक्ष. तंबाखूची ५ रुपयांची पुडी ५० रुपयांत विक्री झाली. वस्तूंच्या साठेबाजांविरुद्ध कारवाई नाही.
पालकमंत्री अमरावती : यशाेमती ठाकूर.
सकारात्मक: विद्यापीठात कोविड – १९ प्रयोगशाळा सुरू व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली. तत्काळ प्रयोगशाळा सुरू करून घेतली.
नकारात्मक: कोविड रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे तत्काळ आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत.
बैठका संख्या 40 | कधी : मार्च ते जून
विशेष काम : चौदाही तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देऊन बैठका घेतल्या. यासोबतच ऑनलाइन बैठका घेत समस्या साेडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
मोठी चूक : केवळ एकच खासगी रुग्णालय हे कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू आहे. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांची संख्या वाढली पाहिजे. ती अद्याप वाढली नाही.
पालकमंत्री यवतमाळ : संजय राठाेड.
सकारात्मक: कोरोना काळात वेळोवेळी बैठका घेऊन प्रशासकीय अधिकारी यांना सूचना दिल्या. चांगल्या कामाचे कौतुक करून अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले.
नकारात्मक: प्रत्यक्ष ऑनफील्ड उतरण्यात मागे राहिले. कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या नाहीत.
बैठका संख्या 10 | कधी : मार्च ते जून
विशेष काम : परराज्यातून अनेकांना घरी परत आणले. दुसऱ्या ठिकाणी अडकलेल्यांच्या खात्यात प्रत्येकी १ हजार रुपये टाकले. धान्यवाटप केले.
मोठी चूक : मतदारसंघात येणाऱ्या दिग्रस, नेर आणि दारव्हा या तालुक्यांवरच विशेष लक्ष दिले. इतर जिल्ह्यांत मात्र त्यांचे विशेष लक्ष राहिले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.