आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुरुंगात कोरोना:अकोला जिल्हा कारागृहातील 300 पैकी 68 कैदी कोरोना पॉझिटिव्ह, जेलमध्येच केले आयसोलेट

अकोला10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकोला तरुंगात यापूर्वी 18 कैदी पॉझिटिव्ह आढळले होते, शहरात एकूण 1498 रुग्ण

अकोला जिल्हा कारागृहातील 300 पैकी 68 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील अनेक कैदी लक्षण नसलेले (एसिम्टोमैटिक) आहेत. या पॉझिटिव्ह कैद्यांसाठी तुरुंगातच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. याबाबत उप जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले की, कैद्यांची देखभाल करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

तुरुंगात सध्या 300 कैदी

तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्हा कारागृहात सध्या 300 कैदी आहेत. यापूर्वी 24 जूनला 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 1498 कोरोना संक्रमित असून, 76 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या 378 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, 1 हजारांपेक्षा जास्त रुग्ण ठीक झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...