आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नागरिकांना महापालिका पाणी पुरवठा विभागाच्यार वतीने पाणी पट्टीची भरमसाठ देयके वितरीत करण्यात आली आहे. काहींना 5 हजार तर काहींना 20 ते 30 हजाराची देयके देण्यात आली. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
शिवसेनेने या निषेधार्थ महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला. तत्कालीन सत्तााधा-या विरोधात घोषणाबाजी करीत वाढीव पाणी पट्टी देयकांची होळी केली, तसेच पाणी पट्टीची देयके कमी केल्या शिवाय पाणी पट्टीचा भरणा करणार नाही असा इशारा देखील देण्यात आला.
नागरिक त्रस्त
महापालिकेने ज्या नागरिकांच्या नळांना मीटर लावले आहेत त्यांना प्रतिमहा 120 तर ज्या नागरिकांनी मीटर लावले नाही अशा नळ धारकांना 300 रूपये प्रतिमहा देयके दिली जातात. देयके देतांना अनेकांना दोन ते तीन वर्षाची देयके एकत्र दिली गेली आहे. तसेच तांत्रिक चुकामुळे नागरिकांना वाढीव देयके वितरीत केली गेली आहे. यामुळे नागरिक वैतागले आहे. अनेकांनी ही देयके कमी करण्याची मागणी केली होती.
शिवसेनेकडे केली तक्रार
स्लम भागातील नागरिकांनी शिवसेनेकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर आणि शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी यावेळी पाणी पट्टी देयके कमी करा, हे पाप कुणाचे अशी घोषणाबाजी केली. तसेच वाढीव पाणी पट्टी देयकांची होळी करुन निषेध व्यक्त केला. या मोर्चात नितिन मिश्रा, नितिन ताकवाले, अश्विन नवले, गजानन चव्हापण, शरद तुरकर, योगेश अग्रवाल, अनिता मिश्रा, मंजुषा शेळके, सपना नवले, सुनिता श्रीवास आदिंसह शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.