आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:नेट मीटरिंगकडे ‘मेडा’च्या दुर्लक्षाने मनपाचे पावणेदोन कोटींचे नुकसान ; पेच महान, शिलोडा सौरऊर्जा प्रकल्प ठरले शोभेचे

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत महापालिकेच्या महान जलशुद्धीकरण केंद्र परिसर, शिलोडा मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात ६ कोटी ५२ लाख खर्चून सौर ऊर्जा प्रकल्प उभारले. मात्र नेट मीटरिंग न केल्याने हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होवू शकले नाहीत. त्यामुळे मनपाला १०० टक्के विद्युत देयकाचा भरणा करावा लागत आहे. परिणामी मनपाचे आतापर्यंत पावणे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. महान येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम होवून पाच महिन्यांपेक्षा अधिक तर शिलोडा येथील प्रकल्पाचे काम होवून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला. सौर ऊर्जा प्रकल्पाचा डीपीआर मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मार्फत शासनाकडे पाठवला होता. १४०० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यापैकी ९९० केव्हीचा प्रकल्प महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तर उर्वरित प्रकल्प शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारला. मेडाने हे काम बेल कंपनीला दिले होते. दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ नेट मिटरींगमुळे या प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले आहे. ‘मेडा’ने याकडे दुर्लक्ष केल्याने आणखी काही महिने या प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडणार आहे. दृष्टिक्षेप महान सौरऊर्जा प्रकल्प Âप्रकल्पाची जागा-१०,२३० चौ.मी. Âक्षमता - ९९० केव्ही Âपॅनल - ३०६० Âपॅनल साईज - २X१ मीटर Âमॉडेल मॉनिटरींग स्ट्रक्चर - १५३ Âईर्न्व्हटर - १५ Âवीज युनिट निर्मिती - दररोज ४१०० केव्ही असे होतेय महापालिकेचे आर्थिक नुकसान

शिलोडा येथील सौर ऊर्जा प्रकल्प. मनपाला करावा लागतो १०० टक्के वीज देयकाचा भरणा जलशुद्धीकरण केंद्रासाठी महापालिकेला महिन्याकाठी २.५० ते ३ लाख वीज युनिट खर्च करावे लागतात. महिन्याकाठी साधारणपणे २५ ते ३० लाख रुपयाच्या वीज देयकाचा भरणा करावा लागतो. तर शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र अद्याप १०० टक्के सुरु झालेले नाही. परंतु महिन्याकाठी तीन लाख ५० हजारांचे वीज देयक द्यावे लागते. या दोन्ही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वयन झाले असते तर मनपाच्या विद्युत देयकात मोठी कपात झाली असती. मात्र कार्यान्वयन न झाल्याने मनपाचे आतापर्यंत पावणे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिलोडा सौरऊर्जा प्रकल्प Âप्रकल्पाची जागा - ५४५० चौ. मी. Âक्षमता - ४१० केव्ही Âपॅनल - १२६० Âपॅनल साईज - २X१ मीटर Âमॉडेल मॉनिटरींग स्ट्रक्चर - ६३ Âईर्न्व्हटर - ६ Âवीज युनिट निर्मिती - दररोज ३५०० केव्ही

बातम्या आणखी आहेत...