आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:मनपा प्रभाग आरक्षणावरील हरकतीचे रजिस्टर कोरेच ; सहा जूनला दुपारी तीनपर्यंत नागरिकांना दाखल करता येणार हरकती

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ मे रोजी प्रभागाच्या आरक्षणाच्या सोडतीवर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन जूनला एकही हरकत दाखल झाली नाही. त्यामुळे आरक्षणावरील हरकतीचे रजिस्टर अद्याप कोरेच आहे. सहा जुन दुपारी तीन वाजे पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ३१ मे रोजी प्रभाग आरक्षणाची सोडत काढली. यात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती महिला, सर्व साधारण महिला गटाची सोडत काढण्यात आली. एक जूनपासून हरकती दाखल करता येणार होत्या. मात्र पहिल्या दिवशी तसेच दुसऱ्या दिवशी एकही हरकत दाखल झाली नाही. ६ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत आरक्षणाच्या सोडतीवर हरकती स्वीकारणार आहेत. या हरकतीचा निपटारा झाल्यानंतर १३ जूनला अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...