आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव:कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केली शेतशिवाराची पाहणी; उपाययोजनांची दिली माहिती

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला तालुक्यातील बाबुळगाव येथील एका शेतात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी यासंदर्भात उपाययोजनांसंदर्भात सुचना दिल्या आहेत.

बाबुळगाव येथील अग्रवाल जिनीन मिल जवळील शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे, प्रा. डॉ. प्रविण राठोड, प्रा. उपेंद्र कुलकर्णी, क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत संशोधन सहायोगी गणेश वाघ यांनी गुलाबी बोंड अळीची पाहणी केली. या पाहणीत त्यांना गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणची कपाशी पेरणी ही 3 जुनला झालेली आहे. येथील कामगंध सापळ्यामध्ये दर आठवड्याला 5 ते 7 नर पतंग आढळून आले आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी झालेल्या कपाशीवर सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कपाशी फुलपात्यावर असताना ही अळी आक्रमण करते. फुल, पाते व बोंड हेच या अळीचे खाद्य आहे. सध्या जास्तीत जास्त कपाशी ही मोसमी पावसातील असून अद्याप फुल पात्यावर आलेली नाही. परंतु फुल पात्यावर आल्यानंतर या कापाशीवर गुलाबी बोंड अळी येऊ शकते, असे अभ्यासकांकडून सांगण्यात येते.

या करा उपाययोजना

  • पीक 90 दिवसाचे होईपर्यंत दर आठवड्यात पिकामध्ये सर्वेक्षण करून मजुराच्या सहाय्याने डोमकळ्या वेचून अळ्यांसहित नष्ट कराव्या.
  • किमान एकरी दोन फेरोमोन सापडे लावावे. सापळ्यातील अडकलेले पतंग किमान दर आठवड्याने नष्ट करावे व आवश्यकतेनुसार 20 ते 25 दिवसातून एकदा त्यातील वडी (ल्युर) बदलावी.
  • उपलब्धतेप्रमाणे एकरी तीन ट्रायकोकार्ड याप्रमाणे पात्या अवस्थेपासून दहा ते बारा दिवसाचे अंतर आणि 4 ते 5 वेळा कपाशी पिकामध्ये लावावे. प्रत्येक ट्रायकोकार्डच्या 20 पट्ट्या कापाव्या, अशा एकूण 60 पट्ट्या कपाशी पिकामध्ये समसमान अंतरावर पिकाच्या खालच्या बाजूला टाचाव्या.
  • सापळ्यामध्ये पतंग अडकण्यास सुरुवात झाल्याबरोबर 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडीरेक्टीन अझाडीरेकटीण 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
बातम्या आणखी आहेत...