आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक भागात फवारणीची कामे जोरात:कपाशी; सोयाबीनवर कीडरोगांचा हल्ला

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सध्या कपाशी आणि सोयाबीन पिकांवर विविध किडींचा हल्ला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या सर्वत्र फवारणीचे कामे जोरात सुरू आहेत. अनेक भागात आतापर्यंत तीन ते चार फवारण्या झाल्या आहेत.जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळत आहेत. याशिवाय मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशीही दिसून येत आहे. सोयाबीनच्या पिकांवरही अनेक भागात किडीचा हल्ला आहे. सोयाबीनवर खोड किड, पांढरी माशी, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव आहे. त्यामुळे शेतकरी फवारणीची कामे करीत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तज्ज्ञांच्या माहितीनुसार खोड किडाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

त्याठिकाणी प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी ४ ते ५ प्रति एकर प्रती पिवळे चिकट सापळे लावावे व व्यवस्थापनासाठी झाडाचे खराब झालेला भाग काढून नष्ट करावा. आर्थिक नुकसानाची पातळीच्या प्रादुर्भावासाठी रासायनिक फवारणीचा सल्ला देण्यात येतो. काही दिवसातील ढगाळ वातावरणामुळे पांढरी माशीही दिसून येत आहे. अनेक भागात कपाशी फुल आणि बोंड अवस्थेत आहे. पातीगळ व फुलगळ नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. याशिवाय अती पावसामुळे काही झाडे मुलुल झाली आहेत. येथेही फवारणी करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरण स्वच्छ असल्याने शेतकरी कपाशी आणि सोयाबीनमधील फवारणीची कामे आटोपून घेत आहेत. अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील कपाशी आणि सोयाबीनच्या पट्ट्यात सध्या सर्वत्र किटकनाशक फवारणीची कामे सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...