आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी झाले त्रस्त:अकाेट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी बंद

अकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढगफुटी सदृश पाऊस, अतिवृष्टी, रोगराई यामधून कशीबशी वाचलेली कपाशी शेतकऱ्यांनी बाजारात आणली. मात्र आता कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. ‘सौदापट्टीवर हलका माल वापस’ ही टीप लिहिण्यास बाजार समितीने नकार दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी हर्रासी करण्यास नकार दिल्याने मंगळवारी ६ डिसेंबरला कापूस खरेदी बंद करण्यात आली होती.

दरम्यान बाजार समितीच्या सचिवांकडून अनुज्ञाप्तीधारक कापूस व्यापाऱ्यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री विकास व विनिमय आधिनियम १९६३ अंतर्गत शोकॉज नोटीस बजावली असल्याने व्यापारी आणि बाजार समितीचा वाद विकोपाला जाण्याची भीती असून, शेतकरी वेठीस धरले जाणार असल्याचे चित्र आहे.

अशातच या वादात शेतकरी पॅनलची एंट्री झाल्याने व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी शुक्रावारी ९ डिसेंबरला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. मंगळवारी ६ डिसेंबरला अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सौदा पट्टीवर हलका माल वापस ही टीप लिहिण्यास नकार दिल्यानंतर कापूस व्यापाऱ्यांनी हर्रासी करण्यास असमर्थ असल्याचे लेखी अर्ज बाजार समितीला देत कापूस खरेदी बंद केली होती.

बातम्या आणखी आहेत...