आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:अकाेट बाजार समितीत कापूस खरेदी बंदच; शेतकरी पॅनलचे बेमुदत उपोषण

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदापट्टीवर हलका माल वापस’ ही टीप लिहिण्यास बाजार समितीने नकार दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी हर्रासीस नकार दिल्याने मंगळवारी ६ डिसेंबरला कापूस खरेदी बंद केली. कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी यांच्या वादात शेतकरी भरडले जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. व्यापारी व बाजार समिती यांनी समन्वय साधून यावर तोडगा काढावा व बंद कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांचे होणारेे नुकसान थांबवावे, या मागणीसाठी शेतकरी पॅनलने बेमुदत उपोषण सुरू केले. कापूस खरेदी बंद झाल्यानंतर शेतकरी पॅनलने बुधवारी ७ डिसेंबरला मुख्य प्रशासक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी आंदोलनकर्त्यांना दोन दिवसाचा अवधी लेखी पत्र देवून मागितला होता. या लेखी पत्रावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांनी दोन दिवसात यावर तोडगा निघून कापूस खरेदी सुरू न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता परंतु गेल्या दोन दिवसात यावर काहीच तोडगा न निघाल्याने व कापूस खरेदी बंदच असल्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पॅनलचे प्रदीप वानखडे, डॉ.प्रमोद चोरे ,सुनि अंबळकार,ॲड.मनोज खंडारे,डॉ.गजानन महल्ले, बाजार समितीच्या आवारात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

बातम्या आणखी आहेत...