आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:पत्नीच्या तक्रारीवरून डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी करीत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध विद्यमान न्यायालयाने पोलिसांना गुन्हे दाखल करण्याची आणि अटक करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.खदान परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टरच्या पत्नीने, माझा पती मला दररोज मारहाण करून अश्लील शिवीगाळ करतो तसेच अनैसर्गिक कृत्य करीत नराधमाप्रमाणे मला वागणूक देतो, अशी तक्रार खदान पोलिस स्टेशनला दिली होती.

पती-पत्नीतील आपसी भांडण असल्याचे सांगत पोलिसांनी आपसात करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पीडित पत्नीने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र नंतर पीडित पत्नीने याप्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावत खासगी तक्रार अॅड. सुमित महेश बजाज यांच्या वतीने न्यायालयात दाखल केली.

या प्रकरणी सोमवारी दुपारी सुनावणी करून यामध्ये विद्यमान न्यायालयाने पीडितांचे वकील अॅड. सुमित महेश बजाज, अॅड भाग्यश्री किटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३७७, ३२३, २९४ नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या प्रथमश्रेणी न्यायाधीश व्ही.पी. दुर्वे यांनी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...