आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला अटक:दुधलम येथे घरगुती वादातून चुलत भाऊ व पुतण्याची हत्या

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुधलम गावात बुधवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास पिता-पुत्राची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली. पोलिसांनी मारेकरी चुलत भावाला लगेच अटक केली. प्रताप पंडित आणि मुलगा सूरज अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर किशोर पंडित असे मारेकरी आरोपीचे नाव आहे.

दरम्यान घरगुती वादातून हे हत्याकांड घडल्याचे पोलिस सांगतात. प्रताप पंडित यांच्या शेजारीच त्यांचे चुलत भाऊ किशोर पंडित राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ वाद आहे. आजही त्यांच्यात घरासमोर पाणी सांडल्यामुळे वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान या वादात किशोर‎ पंडित यांनी कुऱ्हाडीने पिता प्रताप पंडित, पुत्र सुरज‎ पंडित यांच्यावर वार केले.

या हल्ल्यात दोघे पिता पुत्र‎ गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या‎ घटनेची माहिती पिंजर पोलिसांना मिळताच त्यांनी‎ लागलीच घटनास्थळ गाठले. त्यासोबतच उपविभागीय‎ पोलिस अधिकारी आणि अकोला पोलिसांचे स्थानिक‎ गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक यांच्यासह‎ इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्री‎ उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोपीला ताब्यात घेतले
आरोपी किशोर पंडित आणि मृतक प्रताप हे दोघे चुलत भाऊ असून, शेजारीच राहत होते. किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून ही घटना घडली. पोलिस तपासात बाबी समोर येतील. आरोपीला ताब्यात घेतले आहे. -अजय वाढवे, पोलिस निरीक्षक पिंजर

बातम्या आणखी आहेत...