आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आतापर्यंतचा सर्वात मोठा कोविडब्लास्ट:अकोला जिल्ह्यात दिवसभरात 385 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; 2 मृत्यू, आठ दिवसांपासून दोनशे-दोनशेंने वाढताहेत रुग्ण

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकोट, मूर्तिजापुरात आढळले सर्वाधिक रुग्ण, वैद्यकीय सेवा पुरवण्याचे मोठे आव्हान

फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून वाढणारा कोरोनाचा प्रसार दहशत माजवत असून, बुधवारी, २४ तारखेला एकाच दिवसात सर्वाधिक ३८५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कोविडब्लास्ट असून,यापूर्वी २१ फेब्रुवारीला ३४२ रुग्ण आढळले होते. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून अकोला शहरातील विविध वसाहती, अकोट, मूर्तिजापूर भागात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.

वाढता संसर्ग आटोक्यात आणण्याबरोबर वैद्यकीय सेवा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून सद्यःस्थितीत २६६३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांचा आकडा १४ हजार ८०३ वर पोहोचला आहे. त्यापैकी ११ हजार ७८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले . तर ३५९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चाचण्यांचे १८३५ अहवाल प्राप्त आरटीपीसीआरचे १६३७ आणि रॅपिडचे १९८ असे एकूण १८३५ अहवाल दिवसभरात प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोविड बळींचे सत्र सुरूच असून, बुधवारी, २४ तारखेला आणखी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा ३५९ वर पोहोचला आहे.

मृतांमध्ये वाशिंबा बोरगाव मंजू आणि मानाचे रुग्ण
बुधवारी दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये एक वाशिंबा बोरगाव मंजू येथील ५८ वर्षीय पुरुष असून त्यांना १३ तारखेला दाखल करण्यात आले होते. अन्य रुग्ण माना ता. मूर्तिजापूर येथील ७३ वर्षीय पुरुष असून त्यांना २३ तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुपारनंतर मुख्य रस्त्यांवरील फिरते दुकाने अंतर्गत रस्त्यावर,ठिकाणं बदलली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात अाली असली तरी दुपारी जीवनावश्यक वस्तूंची मुख्य रस्त्यांवरील दुकाने बंद झाल्यानंतरही अनेक वस्तूंची अंतर्गत रस्त्यांवर विक्री हाेत असल्याचे बुधवारी दिसून अाले. त्यामुळे टाळेबंदीमध्ये गर्दीची केवळ ठिकाणं बदलली असून, हतबल झालेले प्रशासनही केवळ कार्यवाहीचा दिखावा करुन नंतर साक्षीदाराची भूमिका वठवण्यातच धन्यता मानत अाहे.

२४ दिवसांत २३ मृत्यू
फेब्रुवारीच्या २४ दिवसांत २३ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १९ फेब्रुवारीपासून सलग मृत्यूचे सत्र सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कुठे काय अाढळले?
हुतात्मा स्मारक ते मलकापूर राेडवर जीवनावश्यक वस्तूंच्या अनेक दुकानांवर ग्राहकांनी गर्दी केली हाेती. रस्त्यावर भाजीची विक्री सुरु हाेती. दुपारी ३नंतर मात्र दुकाने बंद हाेताना सुरुवात झाली आणि गर्दीही कमी झाली.

-पेट्राेलपंपावर गर्दी कमी : पेट्राेलपंपावर इंधन भरण्यासाठी मंगळवारी सकाळी नागरिकांनी एकच गर्दी केली हाेती. बुधवारी सर्व पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी ३पर्यंत सुरू ठेवल्याने तुलनेने गर्दी कमी होती.

-जयहिंद चाैकात फळ विक्रीचे दुकान हातगाड्यांवर थाटण्यात अाले हाेते. काही ठिकाणी ३नंतरही सुरुच.

-िवश्रामगृहासमाेर भाजी बाजारातील दुपारी तीन नंतर दुकाने बंद हाेण्यास सुरवात झाली. मात्र ४ वाजतापर्यंत छाेट्या गल्ल्यांमध्ये काही दुकाने सुरु हाेती.

-टपरी बंद; चहा विक्री सुरु : चहा-पान टपरी बंद असल्या तरी चहा-गुटखा पुडीची विक्री मात्र सुरू अाहे. टपरीचे मालक किंवा नाेकर बाहेर थर्मासमध्ये चहा घेऊन उभे असतात. ही बाब आता माहीत झाली आहे.

-अंतर्गत रस्त्यावर फळांची विक्री : सिटी काेतवाली पाेिलसांनी गांधी चाैैक ते ताजना पेठ चौकादरम्यान बुधवारी तीन नंतर धाव घेतली. भाजीपाला, फळ विक्रेते व मेडिकल स्टाेअर्स वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना बंदचे आवाहन करण्यात अाले. अकाेला- गांधी चाैक ते ताजना पेठ चाैकवरील दुकाने दुपारी ३ नंतर बंद झाली. मात्र जैन मंदिरासमाेरच्या अंतर्गत रस्त्यावर फळी िवक्री सुरु हाेती.

अकोट, मूर्तिजापुरात आढळले सर्वाधिक रुग्ण
अकोट, मूर्तिजापूरसह महापालिका हद्दीतील विविध भागात कोरोनाचा संसर्ग धोकादायक वेगात फोफावत असून, बुधवारी, २४ फेब्रुवारीला आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यांमधून अकोट, मूर्तिजापुरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जीएमसी प्रयोगशाळेतून दिवसभरात १६३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. बाधितांमध्ये अकोट येथील ४९, एमआयडीसी व मूर्तिजापूर येथील १४, डाबकी रोड ११, जीएमसी १०, केशवनगर व सुकली प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड व कौलखेड प्रत्येकी सहा, मोठी उमरी व पोपटखेड प्रत्येकी पाच, देवळी, रामदास पेठ व गणेशनगर प्रत्येकी चार, सोपीनाथनगर, दुर्गा चौक, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प, रजपूतपुरा, महाकाली नगर, बाळापूर रोड, अंबुजा, व्हीएचबी कॉलनी व गायगाव प्रत्येकी तीन, गोरेगाव खु., तेल्हारा, बलवंत कॉलनी, राऊतवाडी, शिवाजीनगर, उन्नतीनगर, खोलेश्वर, गंगानगर, खडकी व रिधोरा प्रत्येकी दोन तर उर्वरित पास्टूल, बुधवारी दिवसभरात रॅपिडच्या १९८ चाचण्या झाल्या. त्यात ४५ रुग्ण आढळले आहेत. बाधितांमध्ये बार्शिटाकळी येथे एक, तेल्हारा दोन, मूर्तिजापूर येथे चार, अकोला आयएमए दोन, एक आरोग्य कर्मचारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, हेडगेवार प्रयोगशाळा सात असे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

कान्हेरी सरप, शिवाजी प्लॉट, इन्कम टॅक्स, जिल्हाधिकारी कार्यालय, कपिलवस्तू नगर, कलाल चाळ, बार्शिटाकळी, पुनोती ता. बार्शिटाकळी, कारला ता. तेल्हारा, शिवसेना वसाहत, गीतानगर, देशमुख फैल, हिवरखेड, खोलेश्वर, गौरी अपार्टमेन्ट, सहकारनगर, गौरवनगर, जैन चौक, कीर्तीनगर, उद्यनगर, कृषीनगर, बलोदे-ले-आऊट, गोडबोले प्लॉट, जुने शहर, गवळीपुरा, बाळापूर नाका, शास्त्रीनगर, नयागाव, बिर्ला गेट, नांदखेड टाकळी, यात्रा रोड चौक, भातवाडी बु., चिंचोली, म्हातोडी व गोरेगाव येथील प्रत्येकी एक जण आहे.

सायंकाळच्या १०६ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये मूर्तिजापूर येथील १२, डाबकी रोड सात, सिरसो सहा, हिरपूर, बाळापूर व जठार पेठ येथील प्रत्येकी पाच, भौरद, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, न्यु राधाकिसन प्लॉट, जयहिंद चौक, दहिहांडा व वानखडेनगर येथील प्रत्येकी तीन, विधू नगर, आदर्श कॉलनी, कीर्ती नगर, तापडिया नगर, रामनगर, गोरक्षण रोड, आश्रम नगर, मालीपुरा व खोलेश्वर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बोर्टा, कोरडे हॉस्पिटल, अकोट, दीपक चौक, उमरी, शास्त्रीनगर, गजानन पेठ, जुने शहर, गुडधी, रणपिसे नगर, खडकी, बालाजी नगर, अमाखाँ प्लॉट, गोडबोले प्लॉट, विजयनगर, देशमुख फैल, टिळक रोड, शासकीय वसाहत, रजपूतपुरा, अमरप्रीत कॉलनी, गंगा नगर, गड्डम प्लॉट, सुधीर कॉलनी व गुलजार पुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. सर्वोपचारच्या श्रोतृगृहात कोविड ओपीडी सुरू असून सध्या दिवसाला सरासरी २०० नागरिकांची येथे तपासणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...