आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा तपासणी पथकाचा ठपका:कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना; साहित्याची केली नियमबाह्य खरेदी; जामवसू येथील प्रकार; प्रोत्साहन भत्त्याचीही लूट

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर करण्यात आलेला खर्च नियमबाह्य असल्याचा ठपका जिल्हास्तरीय तपासणी पथकाने चौकशी अहवालात ठेवला आहे. दरपत्रक न बोलावताच साहित्याची खरेदी करण्यात आली असून, मजुरीबाबतचे हजेरीपत्रक ठेवण्यात आले नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार बार्शीटाकळी तालुक्यातील जामवसू ग्रामपंचायत येथे घडला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव एप्रिल २०२०मध्ये सुरू झाला. शहरानंतर प्रादुर्भाव ग्रामीणही भागातही सुरू झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वॉररुम तयार करण्यात आली होती. आरोग्य केंद्र, उपकेंद्रात तपासणीही करण्यात येत होती.

आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक साहित्याचे वितरण करण्यात आले. गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. फवारणीसाठी निधीही खर्च करण्यात आला. मात्र आता या उपाययोजनांवरील झालेल्या खर्चावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे जामवसू येथे घडलेल्या प्रकाराच्यानिमित्ताने पुढे आले आहे.

अहवालात नोंदवण्यात आल्या गंभीर बाबी

  • कोविड प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजने अतंर्गत खर्च हा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केला. खर्चाबाबत जिल्हास्तरीय तपासणी पथकाने गंभीर बाबींची नोंद केली आहे.
  • खर्चाबाबतचा ग्रामपंचायतीने मंजूर केलेला ठराव तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
  • फवारणी व साफसफाईसाठी मजुरीचे हजेरीपत्रक तपासणीसाठी ठेवले नाही. त्यामुळे खर्च झाले अहे किंवा नाही, याची खात्रीच करता आलेली नाही.
  • दरपत्रके न मागवता खरेदी केल्याचे दिसत असून, साहित्य प्राप्त झालेल्या पुरवठ्याशी संबंधित दस्तावेज तपासणीसाठी उपलब्धच नव्हते.
  • खरेदी केलेल्या साहित्याची नोंद व ते साहित्य कोणास वितरीत केले, या तपशीलाची नोंदच नाही.
  • परोक्त बाबी गंभीर असून, नियमबाह्य खरेदी प्रकरणी जबाबदारी निश्चित करून १६४५६६ रुपये वसूल करावे. हा निधी शासनाकडे जमा करावा, अशीही शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...