आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचा:जिल्ह्यात कोविड नियंत्रणात, मात्र स्वाइन फ्लूचा शिरकाव

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहरातील एका ४५ वर्षीय रुग्णाचा वैद्यकीय अहवाल स्वाइन फ्लूसाठी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षात्मक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. संबंधित रुग्णास इतरही आजार असून, या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.जिल्ह्यातील कोरोनाचे संकट नियंत्रणात येत असतानाच अनेक भागात व्हायरल तापानी डोके वर काढले होते. त्यानंतर आता स्वाइन फ्लूने शिरकाव केला आहे. शहरात सध्या स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्यातील एक रुग्ण अकोला शहरातील तर दोन रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर व जळगाव जामोद या तालुक्यातील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नाही, किंवा उपचारासाठी दाखल नाही. रुग्ण आढळल्यास दाखल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली आहे.

स्वाइन फ्लू-कोविड लक्षणांमध्ये साम्य : स्वाइन फ्लू या आजाराचा संसर्ग हा नाक, डोळे, तोंडावाटे होतो. ताप, थंडी, सर्दी, कफ, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, डायरिया, उलट्या आदी स्वरूपातील लक्षणे यामध्ये दिसून येतात. यातील बहुतांश लक्षणे ही कोविडमध्येही आढळून येत आहेत. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

एका रुग्णाचा नागपुरात मृत्यू : शहरातील एका ४० ते ४२ वर्षाच्या रुग्णाचा नागपूर येथे स्वाइन फ्लूवर उपचार घेत असताना यापूर्वी मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्ण हा कामानिमित्त नागपूरला गेला होता, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली आहे.

अकोल्यातील एक रुग्ण अकोल्यातील एक ५५ वर्षीय रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यातील दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातीलच एका रुग्णाचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तो रुग्णही स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह होता. - डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

आतापर्यंत ८९४ जणांची स्क्रीनिंग जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या ८९४ रुग्णांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे. जे रुग्ण कोविड संदिग्ध म्हणून निदर्शनास आले आहेत. लक्षणे आहेत मात्र कोविड चाचणी निगेटिव्ह आहे, अशा रुग्णांची स्वाइन फ्लूसाठी चाचणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...