आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्री विश्वकर्मामय पांचाळ समाज मंडळातर्फे श्रीमद् संगीत भागवत कथा महायज्ञाचे आयोजन करण्यात आले हाेते. या कथेची सांगता शुक्रवारी झाली. कारगिरांनी नव्या तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहन बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील आमदार डाॅ. संजय रायमुलकर यांनी याप्रसंगी केले. डाॅ. रायमुलकर यांनी बदलत्या काळात विश्वकर्मा वंशीयांनी परंपरागत व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जाेड दिली पाहिजे, युवकांनी नव्या संधीचा शाेध घेऊन करिअरची निवड करावी, असे आवाहन केले. विश्वकर्मा समाजाने संघटीत हाेत समाजाच्या उत्थानासाठी याेगदान द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भागवत कथा २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत झाली.
मोठी उमरी येथील श्री विश्वकर्मा मय सभागृह येथे भगवान विश्वकर्मा, गणेशमूर्ती, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती व संत श्री गजानन महाराज मूर्तींची प्रतिष्ठपणा करण्यात आली. शुक्रवारी विश्वकर्मा जयंतीचा मुख्य कार्यक्रम झाला. सकाळी श्री विश्वकर्मा पूजन व होमहवन झाले. त्यानंतर बेलुरा येथील भागवताचार्य महेश महाराज मारवाडी यांच्या काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर आयाेजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विश्वकर्मामय पांचाळ समाज मंडळाचे अध्यक्ष राम यवतकर हे हाेते.
या वेळी मंचावर मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, विजय खाेलगडे, वसंतराव खोलगाडे, संजय लाखेकर, दिनकरराव बलंमकर, अरुण वरुळकर, गजानन सावरकर, प्रा. विवेक शास्त्रकार, किशाेर फुलकर सुरेश राजहंस, संताेष वाघमारे, वामनराव राजहंस, माणिकराव पुनकर, दामाेदर अंजनकर, रामेश्वर सुरते, केशव वडतकर, गणेशराव वडतकर आदी उपस्थित हाेते. प्रास्ताविक राजहंस यांनी केले तर संचालन हत्यारकर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.