आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:अवैध नळजोडणी आढळल्यास आता होणार फौजदारी कारवाई; जोडणी वैध करून घेण्याचे मनपाचे आवाहन

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक भागात नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची परवानगी न घेता अवैध नळ जोडणी केलेली आहे. यामुळे मनपाद्वारे शहरात करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनामध्ये अडचण निर्माण होत आहे. ते बघता अवैध नळ जोडणी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहरातील अवैध नळ जोडणी घेणाऱ्यांनी आठवड्याच्या आत त्यांच्याकडे असलेली अवैध नळ जोडणी वैध करून घेण्यासाठी महापालिकेतील जलप्रदाय विभागाशी संपर्क साधावा. आवश्यक शुल्क भरून नळजाेडणी वैध करून घ्यावी. अन्यथा पुढील आठवड्यापसून अकोला महापालिकेद्वारे अवैध नळ जोडणी आढळल्यास त्यांची नळ जोडणी खंडीत करून त्यांच्याविरूद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रसासनाने दिला आहे. ही अप्रिय कारवाई टाळण्यासाठी अवैध नळ जोडणी वैध करून घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले.

अशी करता येईल नळ जोडणी वैध : नळ जोडणी घेण्‍यासाठी छापील अर्ज, चालू वर्षाचा मालमत्‍ता कर भरल्‍याची पावतीची, छायांकित प्रत (कर आकारणी झाली नसल्‍यास खरेदीची प्रत), १०० रुपयांच्या स्‍टॅम्‍प पेपरवर आवश्‍यक करारनामा, मीटर घेतल्‍याची पावती, मीटरचा मेक व क्रमांक अर्जावर नमुद करणे आवश्‍यक आहे. आधार कार्डाची छायांकित प्रत, दोन पासपोर्ट साईज फोटो, नळ कनेक्‍शन करणाऱ्या मनपाचे अधिकृत प्‍लंबरचे नाव, मनपाच्या विभागीय फिटरमार्फत नकाशासह परिपूर्ण अहवाल, मनपाच्या विभागीय अभियंत्यांचा अहवाल, अर्धा इंची नळ जोडणीसाठी लागणारी मनपाचे ३,२५० रुपये शुल्क, पाऊण इंची नळ जोडणीसाठी लागणारे मनपाचे ४,७५० रुपये शुल्क, या व्यतिरिक्त नळ जोडणी करता लागणारे साहित्य व मजुरीचा खर्च ग्राहकास वेगळा करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...