आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांचा मृत्यू:संकट पहिल्याच पावसात 30 हेक्टरवरील पिकांची हानी; 9 जनावरांचा मृत्यू ; घरांच्या नुकसानीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत आठवठ्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार गावांमधील ३० हेक्टर क्षेत्रातील केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, जनावरे मृत्युमुख पडली आहेत. जिल्ह्यात ११ जूनला विविध भागात मेघगर्जना, विजांचा लखलखाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यात अकोट, तेल्हारा, अकोला तालुका व शहर परिसराचा सामवेश होता. मान्सूनपूर्व पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली होती. वादळी वाराही सुटला होता. केळी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अकोट तालुक्यात अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली व घरांचे नुकसान झाले. दानापूर परिसरात केळी बागांचे नुकसान झाले होते. येथेही पाऊस बरसला “ बोरगाव मंजू, मूर्तिजापूर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली होती. पावसाचा सर्वाधिक जोर राजनापूर परिसरात होता. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहत होता. पावसाचा जोर वाढल्याने नाले वाहते झाले होते. हे झाले होते नुकसान Âजिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला होता. Âपावसाचा फटका ६ घरांना बसला होता. यात घरांची अंशत:पडझड झाली होती. Â चार गावांमधील ३० हेक्टर क्षेत्रावरील केळी व भाजीपाला पिकांना फटका बसला होता. येथे झाले होते नुकसान तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, दानापूर, सौंदळा, कारला, सोनवाडी, हिंगणी, वारखेड, झरी आदी गावात केळीचे नुकसान झाले आहे. हिवरखेड-सोनाळा राज्यमार्ग, दानापूर- सौंदळा व विविध रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. नुकसानग्रस्त भागाची तातडीने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...