आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन नर्सिंग कौन्सीलच्या निकषानुसार सामान्य वॉर्डात तीन रुग्णांमागे एक परिचारिका तर अतिदक्षता विभागात एका रुग्णामागे एक परिचारिका सेवेवर असणे आवश्यक आहे. मात्र शहरातील सर्वोपचार रुग्णालयात एकेका नर्सला तब्बल पन्नास रुग्णांना सेवा द्यावी लागते. हे करत असताना परिचारिकांना प्रचंड कसरतीला सामोरे जावे लागले. ही स्थिती एकट्या सर्वोपचार रुग्णालयातील नाही. तर जिल्ह्याच्या विविध शासकीय रुग्णालयांच्या एकूण परिस्थितीचा विचार केल्यास ८२८ मंजूर पदांपैकी ५८६ पदे भरलेली तर २४२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवेचा कणा असलेल्या नर्सेसची रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणांवर उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पश्चिम विदर्भात वैद्यकीय सेवांसाठी अकोला शहराची ओळख आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय, अशी महत्त्वाची रुग्णालये शहरात आहेत. अकोला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्ण येथे येतात. येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, अपघात, प्रसुती, विषबाधा, जळीत रुग्ण अधिक असतात.
यामध्ये रुग्णांची शुश्रूषा, औषधोपचार व त्यांना मानसिक आधार देण्यात परिचारिकांचा मोलाचा वाटा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे एकेका परिचारिकेला तब्बल ५० ते ६० रुग्णांना रुग्णसेवा पुरवावी लागते परिणामी रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावीत होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण सहन करून परिचारिकांना आरोग्य सेवा द्यावी लागते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.