आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांची हानी:अतिवृष्टीने पिकांची हानी; वाढीव दराने मदतीसाठी 39 कोटी 30 लाख मंजूर

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जुलैत अतिवृष्टी-ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने सोमवारी वाढीव दराने मदत जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्याला ३९ कोटी ३० लाख मंजूर झाले. जुलैत १ लाख २२४५६.८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाल्याने यापूर्वीच ८४ कोटी ३६ लाखांची मदत मंजूर झाली होती. ही मदतही शेतकऱ्यांना वितरीत झाली. शासनाच्या महसूल व वन विभागाने वाढीव दराने मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक गावातील पेरण्या उलटल्या होत्या. मात्र त्यानंतर पाऊस झाल्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली होती. २१ ते २४ जुलै दरम्यान पाऊस झाला होता. नदी व नाल्यांना पूर आल्याने गावे बाधित झाली. अतिवृष्टीने काही शेतात पाणी साचले तर काही भागातील शेती खरडली होती. नुकसानाचे कृषी, महसूल व जि. प. कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामे केले होते. त्यानुसार शासनाने मदत जाहीर केली. याचा आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला. मदतीचा आदेश शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्हास्तरावरून तालुक्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे. लाभार्थी निश्चित झाल्यानंतर ही रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा होणार आहेत. मदतीची प्रक्रिया झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पावसामुळे असे झाले होते पिकांचे नुकसान

>जिल्ह्यात जुलैत अतिवृष्टीमुळे १ लाख २१ हजार २९५.३६ हेक्टरवरील कोरडवाहू पिकांचे नुकसान झाले होता. त्याचा फटका १ लाख ७८०८३ शेतकऱ्यांना बसला होता. हे शेतकरी ८२४ गावांमधील होते. हे नुकसान ८२ कोटी ४८ लाख ८ ४४८ रुपयांचे झाले होते. >मुसळधार पावसाचा फटका ५७९.१८ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले होते. या फटका १ हजार ४१ शेतकऱ्यांना बसला होता. हे शेतकरी २०० गावांतील होते. जवळपास ७८ लाख १८ हजार ९३० रुपयांचे नुकसान झाले होते. >जिल्ह्यातील २०४ गावांतील ५८२.३३ हेक्टरवरील फळ पिकेही बाधित झाली होते. परिणामी ९०९ शेतकऱ्यांचे १० कोटी ४ लाख ८१ ९४० रुपयांचे नुकसान झाले होते.

बातम्या आणखी आहेत...