आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा योजना वादात:टक्केवारीनुसार भरपाई मिळेना; भीक नको, हक्काचे पैसे द्या- शेतकरी आक्रमक

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीक वमिा याेजनेअंतर्गत सर्वेक्षण केल्यानंतरही नुकसानाच्या टक्केवारीनुसार भरपाई मिळत नसल्याचे म्हणत अकाेला तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी धाव घेतली. शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना नविेदन सादर केले. आम्हाला भीक नकाे; तर आमच्या हक्काचे पैसे द्या, असे म्हणत शेतकरी आक्रमक झाले.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले. पीक वमिा याेजनेच्या माध्यमातून तरी नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा असते. यासाठी शेतकरी आिण केंद्र- राज्य सरकार हा हिस्सा भरून पीक वमिा काढण्यात येताे.

मात्र शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसा माेबदला मिळाला नाही. दरम्यान नुकसान भरपाईबाबत काेठारी, कुरणखेड, कानशीवणी, पैलपाडा, बाेरगाव मंजर, दापुरा मजलापूर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नीमा आराेरा यांना निवेदन सादर केले. नविेदन देताना राजू दामाेदर, प्रमाेद गावंडे, माेहन गुजर, शरद वाघमारे, प्रकाश पंडागे, बाबूराव वसु, श्रीकृष्ण देशमुख, नीलेश देशमुख, पांडुरंग पिंपळकार, साहेबराव खराटे आदी हाेते.

काय आहे निवेदनात?

अतविृष्टीमुळे शेतीचे 100 टक्के नुकसान झाले असून, वमिा कंपनीला 24 तासाच्या आत तक्रारही दिली. त्यानुसार पंचनाम्यात 80 टक्के नुकसान नाेंदवून फाेटाेही काढण्यात आले.

शेतीचे 100 टक्के नुकसान झाल्यानंतरही भरपाई मात्र हेक्टरी 500, 1000, 1500, 2000 रुपयेच मिळाली. 100 टक्के नुकसान म्हणजे 54 हजार 600 तर 70 टक्के नुकसानाचे किती भरपाई देता येईल, हे वमिा कंपनीला कळत नाही काय, असा सवाल शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे.

अशीही टाळाटाळ

भरपाईच्या मदतीसाठी 27 नाेव्हेंबर राेजी वमिा कंपनीच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी 5 डिसेंबरपर्यंत खात्यात रक्कम जमा हाेईल, असे सांगितल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 5 डिसेंबरला गेल्यानंतर त्यांनी 12 डिसेंबर राेजी पैसा जमा हाेतील, असे सांगितले. मात्र नंतर 15 व 17 तारीख सांगण्यात आली. त्यानंतर वमिा कंपनीचे कार्यालयच बंद हाेते आिण अधिकारीही फाेन उचलत नव्हते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...