आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:अतिवृष्टीचा 77 हजार हेक्टरवरील पिकांना फटका; 58 काेटींचे नुकसान

अकाेला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाचा संयुक्त पंचनामे अहवाल तयार झाला असून, ७७ हजार ७४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे साेमवारी समाेर आले. तूर्तास तरी अनुदानासाठी किमान जवळपास ५८ काेटी ३२ लाखांपेक्षा जास्त रुपयांची गरज भासणार आहे. अंतिम अहवाल मंगळवारी किंवा दाेन दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयुक्तांना सादर हाेण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पुरामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांची हानी झाल्याने तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र आता पेरणीसाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने सर्वाधिक बाळापूर तालुक्यातील रस्ते उखडले असून, अनेक पूलाची दुर्दशा झाली आहे. पुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. अतिवृष्टीचा कापूस, सोयाबीन, ज्वारी, मुंग, उडीद, भाजीपाला या पिकांना फटका बसला.

असा बसला क्षेत्रनिहाय फटका ः १) काेरडवाहू : जिल्ह्यातील ७५ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रावरील काेरवाहू पिकांचे नुकसान झाले असून, बांधित गावांची संख्या ५१४ आहे. यासाठी ५१ काेटी ५७ लाखाचा निधी अपेक्षित असल्याचे समजते.

२) बागायत :जिल्ह्यातील बागायती क्षेत्रातील १०१ हेक्टर जमिनीवरील पिकांची हानी झाली असून, १२४ गावातील पिके बाधित झाली. यासाठी किमान १३ लाख ६६ हजाराचा निधीची गरज भासणार आहे.

३) फळबागा : जिल्ह्यातील ८२.७५ हेक्टर क्षेत्रातील फळांची हानी झाली असून, यासाठी १४ लाख ८९ हजार रुपये निधी अपेक्षित आहे. १ हजार ७०० हेक्टर जमिनही गेली खरडून ः अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे १ हजार ७२४ हेक्टर जमिन खरडून गेली आहे. ही जमिन ३५ गावातील आहे. ही जमिन ४ हजार ५६६ शेतकऱ्यांची आहे. यासाठी किमान ६ काेटी ४६ लाख ६५ हजारांचा निधी अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...