आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:टोमॅटोच्या पिकात गांजाची लागवड; 75 झाडे जप्त

चांदवड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जांबुटके शिवारात टोमॅटोच्या पिकात बेकायदा लागवड केलेली गांजाची एक लाख ३८ हजार ६५४ रुपये किमतीची ७५ झाडे वडनेरभैरव पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.

जांबुटके (ता. चांदवड) शिवारातील शिवओहळ येथील शंकर बांडे (५५) यांच्या शेतात टोमॅटोच्या पिकात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती वडनेरभैरव पोलिसांना मिळताच पोलिसांनी शनिवारी (१९) सायंकाळी घटनास्थळी छापा टाकून टोमॅटो पिकात लावलेली २३ किलो १०९ ग्रॅम वजनाची एक लाख ३८ हजार ६५४ रुपये किमतीची दोन ते चार फूट उंचीची ७५ गांजाची ओली झाडे जप्त केली. वडनेरभैरवचे सपोनि गौतम तायडे, फौजदार डोमदेव गवारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दोडे यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...