आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण‎:शेतकऱ्यांना सुगंधी वनस्पती‎ लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण‎

अकोला‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर तालुक्यातील विवरा येथे प्रमोद‎ इंगळे यांच्या शेतावर शेतकऱ्यांसाठी‎ औषधी व सुगंधी वनस्पती लागवड‎ तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय‎ प्रशिक्षण घेण्यात आले. केंद्र शासनाच्या‎ भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत‎ अखिल भारतीय समन्वयीत औषधी व‎ सुगंधी वनस्पती आणि पानवेली‎ संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख‎ कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे या‎ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.‎ या प्रशिक्षणात अनुसूचित जाती‎ प्रवर्गातील २५ शेतकऱ्यांना मान्यवरांच्या‎ हस्ते १० प्रकारच्या औषधी वनस्पतीं,‎ कृषी संवादिनी, कृषी दिनदर्शिका,‎ पीडीकेव्ही मायक्रो नुट्रियंट ग्रेड-२,‎ टोपले, वनौषधी चूर्ण, कवचबीज‎ बियाणे तसेच सुगंधी तेल याची निविष्ठा‎ वाटप करण्यात आली.

प्रशिक्षणात डॉ.‎ विलास खर्चे, संशोधन संचालक यांच्या‎ मार्गदर्शनात सफेद मुसळी व सुगंधी‎ वनस्पती लागवड तंत्रज्ञान या विषयावर‎ डॉ. नितीन पतके, नागार्जुन वनौषधी‎ उद्यान यांनी तर विविध औषधी‎ वनस्पतींचे गुणधर्म या विषयावर‎ सहायक प्राध्यापक डॉ. अमित देशमुख‎ यांनी मार्गदर्शन केले. औषधी वनस्पतींचे‎ संकलन करून संवर्धन कसे करावे,‎ याबाबत डॉ. मनीष वाकोडे यांनी माहिती‎ दिली. वरिष्ठ संशोधन सहायक डॉ.‎ बालकिशोर मुराडी यांनी औषधी‎ वनस्पतींचे मूल्यवर्धन कसे करावे या‎ विषयी माहिती दिली. या कार्यक्रमात‎ गावातील उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त‎ शेतकरी स्व. शिवदास क्षीरसागर यांच्या‎ पत्नी तथा प्रगतिशील महिला शेतकरी‎ आशा क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात‎ आला.‎

बातम्या आणखी आहेत...