आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती‎ उत्साहात साजरी:स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे सायकल रॅली‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणा‎ रोड कौलखेड, अकोला येथे २‎ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व‎ लाल बहादूर शास्त्री यांची जयंती‎ उत्साहात साजरी करण्यात आली.‎ शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर‎ व कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी‎ डॉ. अनुप कोठारी यांच्या हस्ते प्रतिमेचे‎ पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त‎ शांतता सायकल रॅली व रस्ता सुरक्षा‎ अभियाना अंतर्गत नाटिकेचे आयोजन‎ करण्यात आले.‎ नाटिकेचे दिग्दर्शन प्रशांत ठाकरे व‎ विजया डुकरे यांनी केले. प्रमुख पाहुणे‎ डॉ.अनुप कोठारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा‎ दाखवून सायकल रॅलीची सुरुवात‎ करण्यात आली.

मेघे ग्रुप ऑफ स्कूलतर्फे‎‎ गांधी जयंती निमित्त सर्वच एमजीएस‎ शाखांमध्ये शांतता सायकल रॅलीचे‎ आयोजन केले. . सायकल रॅली स्कूल‎ ऑफ स्कॉलर्स येथून निघून ती कौलखेड‎ चौक, तुकाराम चौक,इन्कमटॅक्स चौक,‎ हुतात्मा चौक येथून मिरवण्यात आली.‎ नंतर स्कूल ऑफ स्कॉलर्स कौलखेड‎ अकोला येथे तिचा समारोप करण्यात‎ आला. स्कूल ऑफ स्कॉलर्सचे पाचशेहून‎ अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी‎ शांतता सायकल रॅलीत सहभाग

मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर,‎ प्रशासकीय अधिकारी राजेशकुमार कड,‎ उपमुख्याध्यापिका कोमल लहरिया,‎ प्राथमिक विभागप्रमुख शुभांगी मिरगे, पूर्व‎ प्राथमिक विभाग प्रमुख नैना मुलक ,क्रीडा‎ विभाग प्रमुख राजेंद्र डोंगरे ,कला विभाग‎ प्रमुख रवींद्र काळपांडे , संगीत विभाग‎ प्रमुख राहुल वानखडे वानखडे, शालेय‎ विद्यार्थी मंत्रिमंडळ, विद्यार्थी शिक्षक,‎ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने‎ कार्यक्रम शांततेत झाला.‎

बातम्या आणखी आहेत...