आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात प्रखर उन्हाचे चटके:बापरे ! जूनमध्येही नागपूर, चंद्रपूरसह विदर्भातील पाच जिल्ह्यांचा पारा 45 अंशांपुढे

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्याला सुरूवात झाली असली तरी विदर्भात उन्हाचे चटके कमी होताना दिसत नाही. शुक्रवारी, 3 जूनरोजी विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे होता. यामध्ये चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याचे तापमान 46 अंशांच्या पुढे नोंदविल्या गेले.

विदर्भाच्या विविध जिल्ह्यात झालेला मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा प्रखर उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत आहे. रात्री आठ वाजेपर्यंत वातावरणात उष्मा राहात असल्याने उकाडा जाणवत आहे.

त्यामुळे मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनचा पाऊस जवळ आल्याने सध्या पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला वेग आला आहे. मात्र दुपारी बारानंतर उन्हाचे चटके जाणवू लागल्याने शेतशिवारामध्ये थांबणे कठीण होत आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात अशीच वाढ कायम राहणार असल्याचे हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी नोंदविलेले कमाल तापमान

  • वर्धा : 45.2
  • गोंदिया : 45.4
  • चंद्रपूर : 46.4
  • ब्रम्हपुरी : 46.1
  • नागपूर : 46.2

उष्णतेच्या लाटेचा इशारा

एरवी जूनच्या सुरुवातीपासून कमाल तापमानात दिलासादायक घट होत असते. मात्र येत्या पाच जूनपर्यंत विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या बहुतांश शहरातील तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या पुढे राहत आहे.

बातम्या आणखी आहेत...