आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढत आहे. २७ ऑक्टोबरला नवीन सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत ५६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. चार दिवसांपासून सरासरी साडेसात हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. मात्र भावांमध्ये अद्यापही समाधानकारक वाढ नाही. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील सोयाबीन विक्रीसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत आहे. पहिल्या दिवशी १,६१९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सरासरी भाव हा ४ हजार ४८५ रुपये होता. त्यानंतर पुढे २ नोव्हेंबरपर्यंत सरासरी भावात किरकोळ वाढ झाली आहे. ३ व ४ नोव्हेंबरला सरासरी ५ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे.
चार नोव्हेंबरनंतर पुन्हा आवकेत वाढ झाली आहे. ९ तारखेला कमीत कमी ४ हजार ३९५ रुपये क्विंटल भाव होता. जास्तीत जास्त भाव ६ हजार १०० रुपये तर सरासरी ५ हजार ६०० रुपये मिळाला. रब्बी हंगामामुळे शेतकरी पेरण्यांच्या तयारीत आहेत. त्यामुळे गरजेपुरते सोयाबीन बाजारात आणत आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षेने सोयाबीन राखून ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.