आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शविणी येथील रेल्वे मालधक्क्यावर पावसामुळे युरिया, सिमेंटचे नुकसान; अकोला व्यापारी असोसिएशनचा दावा

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनविारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शविणी मालधक्क्यावरील युरिया आणि सिमेंट पावसात भजिून खराब झाले आहे. यामध्ये नुकसान झाल्याचा दावा अकोला व्यापारी असोसिएशनकडून करण्यात आला आहे. अकोला रेल्वे स्टेशन येथून चार वर्षांपूर्वी मालधक्का शविणी रेल्वे स्टेशन येथे स्थानांतरीत करण्यात आला. तेव्हापासून अकोल्यात येणारा व्यापाऱ्यांचा माल शविणी येथे उतरवला जातो. सुरुवातीपासूनच येथील प्लॅटफॉर्मवर शेड उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप शेडचे काम झाले नाही.

दरम्यान एक वर्षापूर्वी व्यापाऱ्यांनी शेड उभारण्याचे नविेदन रेल्वे विभागाकडे दिले होते. ज्यात रेल्वेची शेडसाठी जागा आणि व्यापारी असोसिएशन शेड उभारणार होती. मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही. दरम्यान शनविारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही वेळापूर्वीच फलाटावर उतरवण्यात आलेला युरिया आणि सिमेंट पावसात भजिले. यात व्यापाऱ्यांचे माेठे नुकसान झाल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे. रेल्वे विभागाच्या अधिकारी वर्गाकडून रवविारी नुकसानीची पाहणी केली. मात्र, नुकसानीची जबाबदारी व्यापारी वर्ग रेल्वे प्रशासनावर तर रेल्वे अधिकारी संबंधीत ठेकेदारावर ढकलत असल्याचे समजते.

आमदार सावरकरांनी रेल्वेमंत्र्यांकडे मांडली समस्या
राज्यसभा नविडणुकीच्या संबंधाने मुंबई येथे आलेल्या रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी रवविारी शविणी रेल्वे स्टेशन येथील शेड उभारणीची समस्या मांडली. या वेळी त्यांनी यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...