आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवानद:दानापूर ग्रा.पं. येथे महात्मा‎ ज्योतिबा फुले यांना नमन‎

दानापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले‎ यांची जयंती दानापूर ग्रामपंचायत येथे‎ साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच‎ सपना धम्मपाल वाकोडे यांनी सर्वप्रथम‎ महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.‎ यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश‎ येऊल, वासुदेव खवले, रवींद्र तायडे, रवींद्र‎ दांदळे, कपिल घायल, माजी उपसरपंच‎ शेख खालिक शेख उस्मान, धम्मपाल‎ वाकोडे, ग्राम विकास अधिकारी के. एस.‎ इंगळे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक रहाणे,‎ अविनाश जामोदकर, बाळू श्रीनाथ, गणेश‎ खडसान, रामा हागे, देवानंद घनबहादूर व‎ गावातील नागरिक उपस्थित होते.‎ सूत्रसंचालन अशोक राहणे यांनी तर‎ आभार प्रदर्शन अविनाश जामोदकर यांनी‎ मानले. गावामध्ये आकाश वानखडे यांनी‎ तानाजी चौक येथे महात्मा फुले यांच्या‎ प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गावातील‎ बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.‎