आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सुनेने केली सासूला मारहाण; मुलगा, सुनेविरूद्ध गुन्हा दाखल

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सुनेने सासूला मारहाण केली. मुलानेही पत्नीला सहकार्य केले. या प्रकरणी मुलगा व सुनेविरूद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या मुलासोबत व सुनेसोबत वाद झाले.

त्यानंतर सुनेने चाकूने सासूच्या हातावर वार केले. त्यात सासू गंभीर जखमी झाली. त्यानंतर मुलाने आईवर हात उचलला. पोलिसात तक्रार दिल्यास तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलगा व सुनेविरूद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...