आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहात:महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा उत्साहात

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथील उदय बहुउद्देशिय सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेली व्यसनमुक्ती कार्यशाळा उत्साहात पार पडली. आरोग्य सुरक्षा मोहीम’ विना औषधी कसे जगायचे व व्‍यसनमुक्ती अभियान तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणे, धुम्रपान, मद्यपान व मोबाईल फोनच्या अती वापरामुळे होणारे दुष्परिणाम व त्याचे नियंत्रण या विषयावरील अकोला महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांंसाठी विनामुल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक व मानव निर्मित आजार आपत्तीमुळे मानवी शरीर दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले आहे. काही आजार टाळता येत नाही त्यांना धैर्याने तोंड द्यावे लागते पण अनेक आजार आपल्या क्षुल्लक चुकांमुळे आपण स्वत: ओढवून घेतो. हे आजार आपल्याला टाळता येऊ शकतात.

मात्र त्यासाठी स्वत:ला पुढाकार घ्यावा लागेल. मला हे जमणार नाही, मी हे असे कसे करु? या बाबी मनातून काढून टाकाव्या लागतील. उदा. तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणे, धूम्रपान, मद्यापान व मोबाईल फोनच्या अती वापरामुळे होणारे दुष्परिणाम होतो. ही बाब माहिती असतानाही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र या सवयींमुळे नेमके काय परिणाम होतात? याबाबत कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यापासून आपण स्वत:ची कशी सुटका करुन घेवू शकतो? याबाबत माहिती देण्यात आली.

महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उदय बहुउद्देशिय सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संघटक यशवंत लाकडे यांनी नशामुक्ती बाबत आणि निरोगी जीवन कसे जगायचे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संत गजानन महाराज व्यसनमुक्ती केंद्र अकोलाचे दीपक ढवळे, युवा व्यसनमुक्ती जन आंदोलन समितीचे अध्यक्ष अमरदीप सदांशिव, व्यसनमुक्ती प्रचारक राहूल तायडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वेळी नगरसचिव अमोल डोईफोडे, पश्चिम झोनचे क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, विधी अधिकारी शाम ठाकुर, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, एनयुएलएमचे संजय राजनकर आदी महापालिका अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...